Blogger Tricks
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव च्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..........जि.प.प्राथमिक शाळा किनगावचे अॅन्ड्रॉईड मोबाईल साठीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील Apps अॅप्लिकेशन पेज वर क्लिक करा........Blogger Tips and Tricks
गाडगे महाराज


                                       


बालपण
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला.त्यांचे
पूर्ण नाव  डेबूजी  झिंगराजी  जानोरकर  होते.  ते त्यांच्या आईच्या माहेरी,
मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथेलहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची
बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच  त्यांना  शेतीत रस होता,
विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी  त्यांनीरूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्याकाळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले,कोठेही काही काम करावयाचे असले कीगाडगे महाराज स्वतःहून पुढे येत.सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांनाशिकविला.दिनांक १ फेब्रुवारी१९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले,अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचेमदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञानअंधश्रद्धाभोळ्या समजुतीअनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य  वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाचीदुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधेसोपे असत. चोरी करू नकासावकाराकडून कर्ज काढू नकाव्यसनांच्या आहारी जाऊ नकादेवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नकाजातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. मी कोणाचा गुरू नाहीमला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला.देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवतआपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.त्यांनी नाशिकदेहूआळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्यागोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधलीअनेक नद्यांकाठी घाट बांधलेअतिशय गरीबअनाथव अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केलीकुष्ठरोग्यांची सेवा केली.महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबतज्ञानदेवे रचिला पायातुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " 
  • भुकेलेल्यांना = अन्न
  • तहानलेल्यांना = पाणी
  • उघड्यानागड्यांना = वस्त्र
  • गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
  • बेघरांना = आसरा
  • अंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचार
  • बेकारांना = रोजगार
  • पशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभय
  • गरीब तरुण-तरुणींचे =लग्न
  • दु:खी व निराशांना = हिंमत
हाच आजचा रोकडा धर्म आहे !  हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
संक्षिप्त चरित्र
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशनस्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनातहत्तीला पाहावे रानाततर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुखव कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगरअमरावती येथे स्मारक आहे.
संकिर्ण
  • गाडगे महाराजांच्या जिवनावर आधारीत डेबू या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment