Blogger Tricks
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव च्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..........जि.प.प्राथमिक शाळा किनगावचे अॅन्ड्रॉईड मोबाईल साठीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील Apps अॅप्लिकेशन पेज वर क्लिक करा........Blogger Tips and Tricks

छञपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

Shivaji british meusium.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे
 इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या 
परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा
 बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे
 संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने
 विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल
 साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून
हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही 
राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी
 महाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये 
छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
 उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष 
कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि
 विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना 
महत्त्वपूर्ण  स्थान आहे.
            

जन्म
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यात
 इ.स. १६३० मध्ये फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) 
शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

शहाजीराजे

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. 
मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल
सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर
 आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी 
सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. 
 लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. 

जिजाबाई

 होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात 
पुण्याची पुन:स्थापना  करायला सुरुवात केली. 
शिवाजीराजे  लहानाचेमोठेहोत असताना  आणि मोठे 
झाल्यावरही मोठेपणीच्या  सिंहगडावरच्या  स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या 
प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या  
आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी
महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली .
छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या
 कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" आणि 
खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.


पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि 
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी
 कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदरहे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण
 मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव
 त्यांनी राजगड असे ठेवले.

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या
विरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजी
 महाराजांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

आदिलशाहीशी संघर्ष
अफझलखान प्रकरण

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली    आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा
 शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची
 बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा
 आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून
 प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी 
येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत 
चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे
हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा
 विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.
 प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलाखानने शिवाजी
 महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा 
वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजी 
राजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. 
सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर
 झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि 
खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या 
सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य
 छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी
 खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.शिवाजीराजांना जनतेत मिळालेला 
आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने
 करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले
 आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा
 जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.


सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला
 करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी
 एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची
 बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच 
वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा 
उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर 
पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने
शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर 
रवाना केले.

पावनखिंडीतील लढाई


पावनखिंड स्मारक
           पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या  सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा
 शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी 
शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच 
करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर
 पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे 
सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी 
वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो 
पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.
             शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे 
त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी 
सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने
 कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. 
ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्यु
पथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. 
थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्या
वरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.
           शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि
 स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या
 बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

मोगल साम्राज्याशी संघर्ष

मोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे
भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली 
येथे शासन करीत होता.शाहिस्तेखान प्रकरण
               मोगल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला 
वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठ
विले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या
 प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्या
 जवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.
 शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात
 शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे 
अतिशय जोखमीचे काम होते.
           एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या
 माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे
 लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी 
झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून 
खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला
 वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल 
साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे 
शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. 
           अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू 
सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी 
संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. 

सुरतेची पहिली लुट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिकामा होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. 
मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी
 जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतां
नंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली
 सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि 
व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता
 आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही 
पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता 
ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंह 


इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह
 औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

आग्य्राहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या
 आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ 
वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या 
राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता
 त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी 
जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.
शिवाजीराजे दिल्ली दरबारात
शिवाजीराजां बद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर
 कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी 
प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली.
 त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले
 आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना 
मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक
 पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ 
लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा
 घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये
 बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये 
यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे 
कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर
 काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची
 खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. 
बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत
 गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना
 सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला
 त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात
 महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. . ते स्वतः अतिशय लांबच्या
 आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा 
औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ
स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे 
शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस
 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार 
तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.

राज्याभिषेक

राज्याभिषेक
६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक 
करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक
 शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.


साहित्यात व कलाकृतींमध्ये


सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक 
महात्मा ज्योतिबा 
फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून
 त्यांचा पोवाडा लिहिला.शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, 
चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत 
आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ 
मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. 
फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक 
पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने
 त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा,
 स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला
 यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.२४ नोव्हेंबर २००८ पासून
 शिवाजीच्या जीवनावर आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका
 दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली गेली.
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक 
पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या
 रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिर (पुणे) यांची निर्मिती असलेले ’शिवरायांचे आठवावे रूप’ हे महानाट्य 
(लेखक ऋषिकेश परांजपे).
शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात दैवत मानतात
शिवाजीच्या जीवनाचे अंग दाखविणारी अन्य नाटके/चित्रपट
 • रायगडाला जेव्हा जाग येते - लेखक वसंत कानेटकर (३-३-२०१३ पर्यंत २४२५ प्रयोग)
 • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (इ.स. २००९)(चित्रपट - कथा/पटकथा महेश मांजरेकर)
 • ’आग्ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ - लेखक विष्णू हरी औंधकर(१९२०च्या सुमारास)
 • शहाशिवाजी - लेखक य.ना. टिपणीस (१९२०च्या सुमारास)
 • भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट
 • छत्रपती शिवाजी आणि २१वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया(२०१३)
 • जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (२०१३)
 • शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक : लेखक राजकुमार तांगडे) (२०१३)
 • शिवगर्जना (महानाट्य : लेखक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत) (२०१२)
 • शिवाजीच्या जीवनावरील ऍ़निमेशन पट (हिंदी आणि मराठी) - अझहर खान यांच्या ’अमन अनम फिल्म प्रॉडक्शन’ची निर्मिती (ऑगस्ट २०१३)
 • "लाल महालातील थरारक शिव तांडव " हे ’महानाट्य’ (प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)

शिवरायांची वंशावळ 


महात्मा जोतिबा फुले


जीवनसंपादन
Mahatma Phule.jpg
इ.स. १८२७ - जन्म कटगुणसातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोक
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली इ.स. १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली.राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली.ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नावसाहित्यप्रकारलेखनकाळ
तृतीय रत्ननाटकइ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचापोवाडाइ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसबलेखसंग्रहइ.स. १८६९
गुलामगिरीलेखसंग्रहइ.स. १८७३
शेतकऱ्यांचा असूडलेखसंग्रहइ.स. १८८३
सत्सारनियतकालिकइ.स. १८८५
इशारालेखसंग्रहइ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्मलेखसंग्रहइ.स. १८८९
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।