Blogger Tricks
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव च्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..........जि.प.प्राथमिक शाळा किनगावचे अॅन्ड्रॉईड मोबाईल साठीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील Apps अॅप्लिकेशन पेज वर क्लिक करा........Blogger Tips and Tricks

शाळा उन्नत अभियान

          एखादया बागेतून फिरत असताना त्या ठिकाणच्या
श्री नरसाळे एस.एच.
रंगबेरंगी फुले व त्यांचा मनमोहक गंध याने अस वाटत की, हळूच जावं आणि त्या फुलांचागंध घ्यावा तस शाळेच्या भिंतीही  शाळेतील चिमुकल्याचे लक्ष वेधून घेणा-या व त्यांना आनंद देणा-या असाव्यात .यामधून विदयार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी त्यांची पावले  अलगद उचलली जातील. अशा शाळा निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषद जालनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री बी.राधाकृष्णन् यांनी  शाळा उन्नत अभियान हा अभिनव उपक्रम जालना जिल्हयात राबव‍िला.त्याची अंमलबजावणी  जि.प.प्राथमिक शाळा किनगाव, ता-अंबड येथेही करण्यात आली. या उपक्रमान्वये जिल्हाभर शाळा रंगविल्या गेल्या त्यावर विविध शैक्षणिक माहिती लिहिण्यासाठी बहुतेक शाळांनी बाहेरील चिञकारांच्या मदतीने शाळेत शाळा उन्नत अभियानाचे घटक काढले. माञ आमच्या शाळेचे आगळे-वेगळे वैशिष्टे म्हणजे जे दुर्मिळच म्हणावे लागेल, ते असे म्हणजे आमची शाळा चिञरुपांनी शाळा उन्नत अभियानाच्या  घटकांनी जीवंत केली आहे ती एका शिक्षकाने . ते म्हणजे आमच्या शाळेचेच सहशिक्षक श्री नरसाळे सर यांनी . सरांनी शाळा उन्नत अभियानाचे काम करताना त्यांची वर्ग जबाबदारी तर पूर्ण केलीच माञ काम करण्यासाठी  शाळेत सकाळी 6 वाजताच ब्रश आणि रंग घेवून यायचे एवढेच नव्हे तर ते रविवार, सुटटीच्या दिवशीही  ते या शाळेच्या भिंतींना बोलके करण्याच्या कामात स्वत ला वाहून घ्यायचे. सरांचे काम पाहून विदयार्थी जवळ यायची त्यांना ते विचारायचे. याचा असा फायदा झाला की, आमच्या शाळेतील विदयार्थ्यांनी अनेक घटक त्याच वेळेस आत्मसात केले.










































                                                                                शब्दांकन
श्री धुमाळ डी.एस

2 comments:

  1. मा. गिरी सर मुख्याध्यापक, तांडे सर अधयक्ष शा.व्य. समिती किनगाव व सर्व शिक्षक वृन्द यांच्या महान कार्या बध्दल लाख लाख अभिनंदन. आणि पुढिल कार्यासाठी best of luck

    ReplyDelete