Blogger Tricks
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव च्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..........जि.प.प्राथमिक शाळा किनगावचे अॅन्ड्रॉईड मोबाईल साठीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील Apps अॅप्लिकेशन पेज वर क्लिक करा........Blogger Tips and Tricks

शाळेविषयी दोन शब्द

        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव ही एक जालना जिल्हयामधील ग्रामीण भागातील शाळा. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्‍ट्रामध्ये  आज सर्वसामान्य लोकांच्या नजरेमध्ये केविलवाण्या वाटणा-या जिल्हा परिषदेच्या शाळा या आज कात टाकत आहेत.
              अशीच एक शाळा ज्या शाळेला गावाचा आहे आधार व गावाला वाटतो जिचा अभिमान ही शाळा जामुवंताचा अध्यात्मिक वारसा लाभलेली , डोंगराच्या पायथ्याशी वसलेली शाळा. आज या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य, ग्रामस्थ किनगाव व त्याच बरोबर या ठिकाणी कार्यरत असणारे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक यांच्या योगदानातून या शाळेमध्ये विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या हेतूने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचे फलित म्हणून गेल्या दोन-तीन वर्षात विदयार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल दिसून येत आहेत.
             मासिक गुणवत्ता चाचणी, प्रत्येक महिन्याच्या 25 , 26 तारखेस मासिक चाचणी घेतली जाते.  

                चाचणीनंतर दोन दिवसांत शाळेमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात येते. पालक सभेत पालकांना विदयार्थ्यांच्या प्रगती विषयी माहिती दिली जाते. 


                 चाचणीत चांगले गुण संपादन केलेल्या विदयार्थ्यांना बक्षिस वितरण करुन अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले जाते.

             गटपध्दतीने अभ्यास यानुसार शाळेमध्ये प्रत्येक इयत्तांमधील विदयार्थ्यांचे गट पाडून संबंधित गटनायका व्दारे शिक्षक प्रत्येक विदयार्थ्याच्या प्रगतीवर, अडथळयावर वैयक्तिक लक्ष ठेवून आवश्यक गोष्टींची पूर्तता करतात.या उपक्रमां बरोबर शाळेमध्ये एस एम एस सुविधा, पालकांचे प्रगतीपुस्तक, फिरती ढाल, दैनंदिन वर्तमानपञ वाचन यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. तसेच आजच्या माहिती तंञज्ञानाच्या युगात विदयार्थ्यांना संगणकाची माहिती व्हावी यासाठी शाळेतील 50 विदयार्थ्यांना राज्य स्तरीय संगणक शिष्यवृत्ती परीक्षेस बसविण्यास आले आहे .
               आमच्या शाळेला मा.श्री डेरे एस.एच.( शिक्षण उपसंचालक ) यांनी दिनांक 20/12/2013 रोजी शाळेला भेट देवून शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली व शाळेच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


             सन 2012 साली महाराष्ट्र राज्याचे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव माननीय श्री जे.पी.डांगे साहेब यांनी भेट दिली. त्यावेळी शालेय विदयार्थ्यांनी त्यांचे केलेले स्वागत व त्यांच्याशी साधलेला संवाद यावरुन त्यांनी शाळेचे कौतुक केले.

             आज माहिती-तंञज्ञानाने संपूर्ण जग एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध करुन ठेवले आहे. आजचा विदयार्थी उदयाचा देशाचा नागरिक आहे. त्याला जर या वेगाने पसरणा-या व जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला गरज बनू पाहणा-या माहिती तंञज्ञानाच्या साधनांची ओळख नसेल तर तो या माहिती तंञज्ञानाच्या प्रगतीत टिकणार नाही म्हणून या विदयार्थ्यांना या तंञज्ञानाचा अविष्कार त्यांच्या डोळयासमोर असावा तसेच या तंञज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात समावेश करुन घेवून ही प्रक्रिया जीवंत बनवावी. 




              सूर्य, ग्रह,तारे, परिवलन, परिभ्रमन , ऐतिहासिक किल्ले, लेणी, नाणे,ताम्रपट , हदय, रक्तवाहिन्या, रोगजंतू, कवितांच्या चाली,संभाषण, प्राण्यांचे आवाज, गणिती आकत्या , क्षेञफळ, घनफळ संबोध, तसेच इतर सहशालेय माहितीचा खजिना या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या समोर ठेवावा, त्यांनीही शहरी भागातील शाळेप्रमाणे सर्व सुविधायुक्त शिक्षण घ्यावे , अध्ययन-अध्यापनातून अनेक संबोध चिरकाल त्यांच्या स्मरणात राहावेत असे तंञज्ञान शाळेत आणण्याचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कल्याणराव तार्डे तसेच सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य  , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या विचारातून एका तंञज्ञानाची निवड केली . त्याला के-यान या नावाने ओळखले जाते. त्याव्दारे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी या निर्णयाचा खूप फायदा झाला. या तंञज्ञानामध्ये अतिशय अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये ओव्हर हेड प्रोजेक्टर, इन्फ्रारेड पेन, संगणक , माऊस, की-बोर्ड, इंटरअक्टिव बोर्ड यांच्या मदतीने प्रभावी अध्यापन करता येवू शकते. 



             या तंञज्ञानाच्या उदघाटनाच्या प्रसंगी जिल्हा परिषद जालना चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.बी.राधाकृष्णन साहेब , जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मा.श्री बप्पासाहेब गोल्डे पाटील, मा.श्री रमेशभाऊ पैठणे साहेब, पंचायत समिती अंबडचे गटविकास अधिकारी मा.श्री सुनिल मेसरे साहेब, तसेच गटशिक्षणाधिकारी मा. श्रीमती धुपे मॅडम व शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री कुमावत साहेब हे उपस्थित होते.




             युनिसेफ च्या महाराष्ट्रराज्य समन्वयक श्रीमती श्रीनिवासन मॅडम यांनी शाळेला मार्च 2013 मध्ये भेट देवून शाळेच्या मीना-राजू मंचची कार्यवाही  व एकंदरीत शालेय वातावरण पाहून त्या भारावून गेल्या व त्यांनी शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




              
 आमच्या शाळेत युनिसेफ मार्फत बाल हक्क, शिवीबंद शपथ, लेक वाचवा-लेक शिकवा अभियान, महिला सबलीकरण यासारख्या ही अनेक कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येते. 
                       मे 2013 मध्ये उत्कृष्ठ शाळा व्यवस्थापन समितीच्या कामामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.कल्याणराव तार्डे यांचे जिल्हा परिषद जालना मार्फत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा.श्रीमती आशाताई भुतेकर यांनी पुरस्कार देवून गौरव केला.

                 जून 2013 मध्ये पंचायत समिती अंबड मार्फत उत्कृष्ट शाळेचे पारितोषिक महाराष्ट़्र राज्याचे उच्च व तंञशिक्षण मंञी मा.श्री राजेश भैय्याजी टोपे यांच्या हस्ते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कल्याणराव तार्डे यांचा पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.

                  जून 2013 मध्ये शालेय व्यवस्थापन समिती किनगावच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण परिषद यांनी पुणे या ठिकाणी आयोजित शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळेसाठी शाळेला पुणे या ठिकाणी आमंञित केले .



              या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील इतर सर्व शाळांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसाठी वाचन साहित्य या हस्तपुस्तिकेची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ही हस्तपुस्तिका महाराष्ट्रातील सर्व शाळांतील व्यवस्थापन समिती सदस्यांना दिली. यामुळे शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांना त्यांच्या कामाचे स्वरुप व भूमिका समजावून घेण्यासाठी ही हस्तपुस्तिका उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल. तसेच सर्व सदस्यांना प्रत्यक्ष कामात सहभागी करुन घेण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारी व त्यांच्या मनातील प्रश्‍नांची उकल करणारी व निराकरण करणारी राहिल.





                जिल्हा परिषद जालनाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयामध्ये  राबवलेल्या वनराई बंधारा या उपक्रमातही आमच्या शाळेतील चिमुकल्यांचेही हात पुढे सरसावले. त्यांनीही मातीचा वनराई बंधारा बांधला. हा बंधारा पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री बी.राधाकृष्णन् साहेब यांनी भेट देवून बंधा-याची पाहणी केली व चिमुकल्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचा गौरव केला.



               "बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम,2009 " या विषयी समाजामध्ये  लोकजागृती होण्यासाठी श्री कल्याणराव तार्डे व श्री धुमाळ डी.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेच्या विदयार्थ्यांचे एक पथनाटय तयार करण्यात आले. या पथनाटयातून RTE च्या कलमांची माहिती समाजातील सर्व घटकांना होण्यासाठी या पथनाटयाचे वेगवेगळया ठिकाणी अनेक प्रयोग सादर करण्यात येत आहेत.


                      
 
                       राष्ट्रीय बालअधिकार सुरक्षा आयोग , भारत सरकार यांनी दिनांक 14 जानेवारी 2014 व 15 जानेवारी 2014 रोजी   बालकांच्या शिक्षणाचा हक्क ( RTE ) या विषयावर चर्चासञाचे आयोजन नवी दिल्ली याठिकाणी आयोजित केले होते. या भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या शाळेला केंद सरकारने आमंञित केले होते. या कार्यक्रमात आमच्या शाळेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्रीमती कृष्णा तिरथ ( महिला व बाल कल्याण मंञी , भारत सरकार ) या अध्यक्ष स्थानी होत्या. तसेच श्री नरेंद्र जाधव ( सदस्य, नियोजन आयोग भारत सरकार), श्री आर. भटटाचार्य ( शिक्षण सचिव, भारत सरकार), श्री लुईस जॉर्जस ( युनिसेफ ) हे मान्यवर उपस्थित होते.

                    श्रीमती नलिनी जुनेजा ( Chair person NEUPA, Gov. of India ) यांना आमच्या शाळेत राबविल्या जाणा-या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती देताना श्री कल्याणराव तार्डे व शिक्षकवृंद प्रा.शाळा किनगाव.

         बालकांच्या शिक्षणाचा हक्क ( RTE ) या विषयावरील चर्चासञात नवी दिल्ली याठिकाणी  सहभागी झालेली जि.प.प्राथमिक शाळा किनगाव ची टीम.




                       26 जानेवारी 2014 रोजी  आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. आमच्या शाळेतील स्काऊट - गाईडच्या विदयार्थ्यांनी  संचलन करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच काही विदयार्थ्यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा करत ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. 



              दि.०१/०४/२०१४  रोजी  प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा , ता. जि. जालना येथील मुख्याध्यापक श्री गुजर एस. एस., श्री उनवणे एम. आर., श्री गावडे पी. एन .,श्री कावळे व्ही. एन. यांनी आमच्या शाळेतील के-क्लास ला भेट दिली असता  के-क्लास संबधित सविस्तर माहिती मिळवली तसेच आमच्या शाळेतील गुणवत्ता वाढी साठी राबविल्या   जाणा-या उपक्रमांची माहिती घेतली . 





                  ग्रामीण भागात आमच्या  जि. प. च्या शाळेत राबविल्या जाणा-या उपक्रमामुळे   श्री गुजर एस. एस  खूप प्रभावित झाले. त्यांनी आमच्या शाळेचे विशेष असे कौतुक केले. तसेच शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शाळेसाठी ५००१/- रुपयाचे बक्षीस दिले . या बाबत शाळेच्या वतीने त्यांचे आभार.  





      


         अंबड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जि.प.सदस्य्‍ा श्री दत्ताञय वाघ यांनी दिनांक 06/08/2014 रोजी आमच्या शाळेस भेट देवून के-क्लासची पाहणी केली तसेच शाळेत राबविल्या जात असणा-या नाविण्यपूर्ण्  उपक्रमांची माहिती घेवून शाळेचे अभिनंदन केले.



         युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा रोहिलागड ने बॅकींग क्षेञात काम करत असताना सामाजिक बांधिलकी राखत आमच्या शाळेतील गरीब व होतकरु विदयार्थींनी आर्थिक अडचणीमुळे  शिक्षणा   पासून   दूर   जावू   नयेत म्हणून या   मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत या मुलींना युनियन बँक ऑफ इंडियाने दत्तक घेतले असून या मुलींच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी युनियन बँक ऑफ इंडियाने स्वीकारली आहे. 
        
        या विदयार्थींनींना धनादेशाचे वाटप करताना युनियन बँक ऑफ इंडिया औरंगाबाद चे चीफ मॅनेजर मा.श्री शेट़टी साहेब यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण 26 जानेवारी 2014 रोजी करण्यात आले.

            तसेच युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा रोहिलागड चे मॅनेजर मा.श्री दळवी साहेब यांनी ही शाळेच्या प्रगतीसाठी यापुढे युनियन बॅक सर्व प्रकारे सहकार्य करेल असे आश्वासन देत शाळेतील विदयार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी अत्याधुनिक वॉटर फिल्टर शाळेला लवकरच दिले जाईल असे जाहिर केले . युनियन बँक ऑफ इंडिया कडून होत असलेल्या सहकार्यामुळे जि.प.प्रा.शाळा किनगाव सदैव ऋणी राहिल. 


          सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेतील विदयार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . नवीन गणवेशांचे वाटप पंचायत समिती अंबडच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती धुपे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 

            शाळेतील विदयार्थी नवीन गणवेशामध्ये खूप उत्साहाने  शाळेत येत आहेत.


       
                   सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने लोकवर्गणी करुन आमच्या शाळेत संगणक प्रयोगशाळा सुरु करण्यात आली.

                   संगणक प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यासाठी मा.श्री तुकाराम जाधव, अध्यक्ष जि.प.जालना, मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प जालना, मा.श्री मुकीम देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.जालना, मा.श्री बप्पासाहेब गोल्डे,मा. सभापती, जि.प जालना हे सर्व मान्यवर दि 28 नोव्हेंबर 2014 रोजी आमच्या शाळेत आले . 


या प्रसंगी शाळेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कल्याणराव तार्डे यांचा सत्कार मा.श्रीमती प्रेरणा देशभ्रतार ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जि.प.जालना यांनी केला .
                   या प्रसंगी जि .प. प्राथमिक शाळा किनगाव शाळेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री नरसाळे एस.एच. यांना मा.श्री तुकाराम जाधव, अध्यक्ष जि.प.जालना, मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प जालना यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

                    मार्च 2014 मध्ये झालेल्या इ. 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालेल्या कु.अश्विनी हनुमान वाघ या विदयार्थीनीचा सत्कार मा.श्री अशोक राऊत, शिक्षणाधिकारी , जि. प जालना यांच्या हस्ते करण्यात आला.


           अशा प्रकारे वेगवेगळया ठिकाणी आमच्या कार्याची दखल घेतल्यामुळे आम्हांला आमच्या पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली आहे. या प्रेरणेने आम्ही असेच उपक्रम राबवून विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठीचे प्रयत्‍न अविरत सुरु ठेवू.
                                                                               


                                                                                                                                                                                                                                 शब्दांकन


                                                                                                        श्री धुमाळ डी.एस. 
                                                                                                                            स. शि.
                                                                  जि.प.प्रा.शा.किनगाव 




श्री कल्याणराव तार्डे
मुख्य सल्लागार/अध्यक्ष
शा.व्य.समिती प्रा.शा.किनगाव
मो.9822647505,9404694160
E-mail-kalyantarde@gmail.com
श्री नरसाळे एस.एच.
सहशिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव
मो.9404547511,7875193370

E-mail-snarsale770@gmail.com
श्री गिरी एम.व्ही.
मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव
मो.9527632810
श्री धुमाळ डी.एस.
सहाय्यक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव
मो.9403933534

श्री भांगे पी.बी.
सहशिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव
मो.8554043780
श्री रोहोकले एन.बी.
सहशिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव
मो.9403589853

E-mail-ni3rohokale@gmail.com

         






श्रीमती पवार डी.जी.         
            सहशिक्षिका
      जि.प.प्रा.शा.किनगाव

7 comments:

  1. It's a good work Best of luck

    ReplyDelete
  2. ब्लॉग खूप चांगला वाटला. माहिती गरजेनुरूप बदलणं आणि आवश्यकतेनुसार नवीन माहिती टाकणं यात सातत्य मात्र ठेवा.

    ReplyDelete
  3. खरच खूप छान उपक्रम राबविले आहेत पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  4. Very nice.Best of luck...........!

    ReplyDelete
  5. अगदी सुंदर उपक्रम आहे तुमची शाळा आणि स्टाफ लय भारी आपण राबवलेल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछा मी रमेश कर्वे जिल्हा परिषेद शाळा पिंपळगाव कड तुमच्या शाळेस भेट देईल

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर उपक्रम राबविलेत शाळेत आणि सर्वाचा सहभाग हेच यशामागचे कारण आहे.
    सर्वाना धन्यवाद

    ReplyDelete